Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

विद्यापीठात “सर्क्युलर इकॉनॉमी " या विषयावर वेबिनारचे आयोजन : सहभागी होण्याबाबत संचालक प्रा.डॉ.एम्.एस्.देशमुख यांचे आवाहन

 



*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर दि. २४ : शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि २५. ०९.२०२१ रोजी दुपारी ०३.०० वा. ऑनलाईन पध्दतीने “सर्क्युलर इकॉनॉमी” या विषयावर . एक दिवसीय वेबिनारचे आयोजित करण्यात येणार असून सदर वेबिनारमध्ये 'डॉ. अजय देशपांडे, आय.आय.टी. मुंबई, डॉ.चरणसिंह आहुजा, मुंबई व मा. जी. जी. सोहनी, पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत.

         सदर वेबिनारचे अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. डी. टी. शिर्के असतील व प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस्. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

       तरी सदर वेबिनारमध्ये विद्यार्थी, संशोधक, शिक्षक,अभ्यासकांनी व अन्य अभ्यासू घटकांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी करुन वेबिनारमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. डॉ. एम्. एस्. देशमुख यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा