![]() |
सौजन् :,India24.com |
![]() |
प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर अध्यक्ष ,रोटरी क्लब ऑफ सांगली |
प्रा.मनोहर कोरे : उपसंपादक
सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली तर्फे दिनांक २ व ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १.३० या वेळेमध्ये RYLA (Rotary Youth Leadership Award) या अंतर्गत "नेतृत्व व सुक्ष्म कौशल्य विकास" या विषयावर करिअर घडविण्या संदर्भातील ऑनलाईन व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर व्याख्यानमालेत सहभागी होणाऱ्या घटकांना दोन्ही दिवस तज्ञ लोकांचे उत्तम मार्गदर्शन लाभणार आहे.मुख्यत्वे करुन महाविद्यालयीन मुलामुलींना त्यांच्या पुढील कारकिर्दी करीता या परीसंवादाचा चांगला उपयोग होणार आहे.या कार्यक्रमासाठी नाममात्र ₹ १००/- एवढे प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून सदर कार्यक्रम प्रामुख्याने मराठी मध्ये आहे.
इच्छुक व्यक्ती या खालील लिंकवर क्लीक करुन प्रवेश शुल्क भरु शकतात.
👇👇👇👇👇
https: //rzp.io/l/D8tuQ3SLs
अष्टपैलू व्यक्तिमत्व व करिअर घडविण्या संदर्भातील ही रचनात्मक ऑनलाईन व्याख्यानमाले मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा अशाप्रकारचा आवाहन रोटरीचे अध्यक्ष ,प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हनकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा