![]() |
सौजन्य : News 24 |
देशाच्या इतिहासात एक नव्या विक्रमाची भर पडली आहे. भोपाळची विद्यार्थिनी शिवांगी गवांदे हिने व्यवस्थापन चाचणीच्या इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जगातील सर्वात मोठी आणि कठीण व्यवस्थापन चाचणी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अप्टिट्यूड टेस्ट (GMAT) मध्ये तिने जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक आणि देशात प्रथम स्थान पटकाविला आहे.
शिवांगीने केवळ राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली. शिवांगीच्या मेहनतीमुळे आणि प्रतिभेमुळे आज जगभरातील अव्वल विद्यापीठे तिला प्रवेश देण्यासाठी तयार आहेत.
इंग्लंडने घेतलेल्या या परीक्षेत शिवांगीने 800 पैकी 798 गुण मिळून एक नवा विक्रम व इतिहास निर्माण केला आहे. कारण देशात आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराने या परीक्षेत इतके गुण मिळवले नाहीत. या गुणांच्या आधारे केंब्रिज, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, येल, स्टॅनफोर्ड विद्यापीठ यासह देशातील सर्व आयआयएममध्ये प्रवेश घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
या वर्षी जीमॅट 12 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याचा पहिला टप्पा निकाल 27 मार्च आणि अंतिम निकाल 23 एप्रिल रोजी आला. स्क्रीनिंग टेस्टमध्ये शिवांगीला 100% गुण मिळाले. जीमॅटच्या निकालानंतर जगभरातील शीर्ष व्यवस्थापन महाविद्यालयांनी शिवांगीची स्क्रीनिंग टेस्ट घेतली आणि सामूहिक चर्चा केली. यानंतर, केंब्रिज, ऑक्सफोर्ड, हार्वर्ड, येल, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ बिझनेस आणि देशातील सर्व आयआयएमने त्यांची प्रवेश निवड पत्रे पाठवली आहेत.
तिच्या या सर्वोच्च यशाने प्रत्येक भारतीयांची मान ताठ झाल्याशिवाय राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा