हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
१२७ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत ईडी कार्यालयात पोहेचले आहेत. काल जाहीर केल्याप्रमाणे ते ईडीकडे आज अधिकृत तक्रार करणार असून त्याबाबत कागदपत्रे सोपविणार आहेत.कागलचे आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते.हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांकडून दोन कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.
हसन मुश्रीफ आणि परिवाराचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक बेनामी व्यवहार केल्याचे सोमय्या म्हणाले होते.मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार देणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते.मुश्रीफ पिता- पुत्रांनी १२७ कोटींचे बेनामी व्यवहार केले असून मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती प्रकरणी मुश्रिफांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेताच हसन मुश्रीफ यांनी १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
सोमय्या यांच्या डिग्रीवरच शंका व्यक्त करून खुशाल तक्रार दाखल करावे, असे आव्हानही केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा