Breaking

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

*धरणगुत्ती येथील डंपर चोरी प्रकरणातील आरोपीला पकडण्यात शिरोळ गुन्हे शोध पथकास यश*

 

मा.दत्तात्रय बोरिगिड्डे व गुन्हेगारी पथकातील टीम


शिरोळ तालुका प्रतिनिधी - रोहित जाधव


    शिरोळ पोलिस ठाणे गुन्ह्यातील फिर्यादी युवराज विजयसिंग रजपूत वय वर्ष ३८ रा.आझाद चौक,खंडोबा मंदिर जवळ चिपरी,ता. शिरोळ यांनी फिर्याद दिली की दिनांक ५.९.२०२१ रोजी रात्री 11 वाजता ते दिनांक ६.९.२०२१ रोजी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांनी लमानी वसाहत नांदणी नाका, धरणगुत्ती येथे लावलेली टाटा कंपनीची टीपर डंपर MH 09 3067 ही फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेले बाबत तक्रार दिली होती.

      सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत मा.पोलीस निरीक्षक बोरीगिड्डे  सो शिरोळ पोलिस ठाणे यांनी गुन्हे पथकाकडील अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन माहिती काढण्यास सांगितले. त्याप्रमाणें सदर गुन्ह्याबद्दल सखोल तपास करून गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी काढून सदर गुन्ह्यातील संशयित इसम संतोष अशोक अलकुटे वय वर्ष 30 राहणार समडोळे मळा,पटेल चौक. जयसिंगपूर ता. शिरोळ यास गुन्ह्याबद्दल कसून चौकशी केली असता त्यांनीं गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील चोरलेला टाटा कंपनीची टीपर डंपर नंबर MH 09 CA 3067 किँमत 2,00,000 रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉ्स्टेबल माळी करीत आहेत,

      सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर, मा जयश्री गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकंरजी, मा रामेश्र्वर वैंजने उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्र्वर सानप, हनुमंत माळी, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला,गजानन कोष्टी, संदीप हेगडे,संजय राठोड व युवराज खरात या पथकाने केली आहे.

     शिरोळ पोलिसांनी अत्यंत अल्प काळात संशयित गुन्हेगारास पकडून केलेली कारवाई  कौतुकास्पद असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा