![]() |
सिनेअभिनेते दगडू माने |
प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शिरढोण येथे "औंदा लगीन करा,,,," गाण्याचे लॉन्चिंग
शिरढोण : गाव अध्यात्मिक विचाराबरोबरच, सांस्कृतिक व साहित्य चळवळीत अग्रेसर आहे.लेखक-कवी व्याख्याते, साहित्य परिषद संस्थेचे सचिव डॉ.कुमार पाटील यांनी 'औंदा लगीन करा,,,,' हे लोकगीत उत्कृष्टपणे लिहून सध्याच्या लग्ना संदर्भातील पिढीची व्यथा मांडली आहे.महाराष्ट्रभर हे गाणं गाजणार असून लेखक डॉ.कुमार पाटील यांच्यासह सर्व कलाकार टीमने याकामी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, यापुढेही सांस्कृतिक क्षेत्रात नवनिर्मितीची गाणी , कथा संवाद लेखनातून प्रतिभावंत कलाकार घडावेत, याकामी सर्वोतोपरी मदत करेन असे गौरवोद्गार नाट्य- सिनेअभिनेते दगडू माने यांनी व्यक्त केले.
शिरढोण येथील श्रीकृष्ण मंदिरात लेखक-कवी व व्याख्याते डॉ. कुमार पाटील यांच्या 'औंदा लगीन करा' हे लोकगीत गाणे प्रदर्शित करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते माने बोलत होते. शिरढोण येथील ज्येष्ठ पत्रकार व साहित्य परिषद बहुद्देशीय संस्था शिरढोणचे अध्यक्ष दिलीप कोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रंथ व मास्क भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अभिनेते दगडू माने म्हणाले, 'सध्या समाजात घडणाऱ्या वास्तवतेचे दर्शन असणारी मांडणी या लोकगीतात केली आहे. सध्या लग्नाकरिता मुलां- मुलींची अपेक्षा वाढल्या आहेत. वय वाढले तर लग्न होईनात. पूर्वी वडील लग्न मुलाचे ठरवत होते . पण, सध्या ती परिस्थिती राहिली नाही. गीतकार डॉ. कुमार पाटील , निर्माता - कवी दिनकर खाडे ,संगीतकार नरेंद्र सूर्यवंशी, गायक शितल कोळी यांचे कौतुक करतो, असे सांगून दगडू माने म्हणाले, शिरोळ येथे 18 सप्टेंबर रोजी अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ येथे होणाऱ्या पुणे -मुंबई न्यूज चैनल नेटवर्क प्रसारित कार्यक्रमात 'औंदा लगीन करा,,,' या गाण्यावर नृत्य सादर करून गाण्याचा व्हिडिओ स्वरूपात लाँच केला जाईल असे सांगून त्यांनी संपूर्ण कलाकार टीमला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार दिलीप कोळी म्हणाले, डॉ.कुमार पाटील शिरढोण गावचे 'बाळकृष्ण' आहेत. कोणत्याही कामात आळस झटकून काम करतात. व्याख्याते कवी-लेखक आहेत. आजपर्यंत विविध विषयावर 250 व्याख्याने झाली असतील. डॉक्टर व्यवसाय सांभाळून कला जोपासत आहेत. गीतकार डॉ. कुमार पाटील, गायक शीतल कोळी , सांगितकार नरेंद्र सुरवंशी, निर्माता दिनकर खाडे या सर्व टीमला शुभेच्छा देतो असेही श्री दिलीप कोळी म्हणाले.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सतीश भंडारे, दत्त चॅरीटेबल ट्रस्ट संस्थापक चेअरमन महादेव पाणदारे, निर्माता दिनकर खाडे ,अभिनेते रावसाहेब भोसले, सामाजिक कार्यकर्ते ओमकार शिरगिरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी देव स्टुडिओ इचलकरंजीचे शुभम जाधव- देव जाधव, श्री रंगा खोत, यशवंत कुंभार, अजित चौगुले , राजु खोत, सुनील कांबळे, हैदरअली मुजावर , बाळासो हेरवाडे ,शक्तीकुमार कांबळे ,निवास कांबळे, विजय सूर्यवंशी, संतोष सैसाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वागत श्रीकृष्ण मंदिर संस्थापक अविनाश पाटील यानी केले, साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी प्रास्ताविक केले. आभार संजय सुतार यांनी मानले.आदर्शशिक्षक श्री संजय गुरव यांनी सूत्रसंचालन केले.
धन्यवाद
उत्तर द्याहटवा