महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०२१-२२ मधील परीक्षांच्या नियोजित तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्याची अंदाजीत वेळ जाहीर केली आहे.आयोगाने या सूचना आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून केल्या आहेत.
आयोगाच्या सांगण्यानुसार, राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० च्या परीक्षांचे वेळापत्रक १३ ते २० सप्टेंबर , २०२१ मधे जाहीर केल्या जातील.
तसेच २०२२ मधील आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० चे दिनांक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 9, 2021
आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार सन २०२२ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 9, 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा