![]() |
धरणगुत्तीत अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना |
गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी
धरणगुत्ती गावाच्या हद्दीतील लंगरे मळा येथील भीमराव माळी यांच्या विहिरीत पुरुष जातीचा मृतदेह आज पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीवरून आज शनिवारी दि.११/९/२०२१ रोजी सकाळी भिमराव माळी यांच्या विहिरीत पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना आढळला असून धरणगुत्तीचे पोलीस पाटील संभाजी भानुसे यांनी पोलिसात तशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढून शिरोळ सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. माशांनी चेहरा विद्रूप केल्यामुळे व चेहरा फुगल्यामुळे मृतदेहाची ओळख पटली नाही. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा हे मात्र शंकास्पद राहिला आहे.
अधिक तपास पोलिस ठाण्याचे श्री कुंभार करीत आहेत या घटनेची नोंद बेवारस अशी झाली आहे. मात्र ही व्यक्ती कोण? आत्महत्या की हत्या? याची चर्चा धरणगुत्तीसह पंचक्रोशीत सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा