![]() |
संग्रहित छायाचित्र |
डोंबिवलीः अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून त्याच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर ३० जणांनी मागील ९ महिन्यापासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत २ अल्पवयीन आरोपीसह २३ जणांना अटक केली आहे व उर्वरित ६ आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास ठाणे सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढोले करत आहेत.
डोंबिवली - भोपर परिसरात राहणाऱ्या या पीडित १४ वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती या ओळखीतून त्यांच्यात शारिरीक संबध निर्माण झाले. मात्र तरुणाने या तरुणीचे अश्लील व्हिडीओ केला व या व्हिडीओच्या आधारे या तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर मित्रांसोबत या तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा या पीडित तरुणीचा आरोप आहे. मागील ९ महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० जणांनी पीडितेला व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत विविध ठिकाणी तिला नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा