![]() |
कृष्णा नागर |
टोकियो - पॅरालिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी भारताने दोन पदकांची कमाई केली. कृष्णा नागरनं बॅडमिंटन खेळात भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक आणलं तर सकाळी सुहास यथिराजने देखील बॅडमिंटन खेळात रौप्यपदकाची कमाई केली.
भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक 2021 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 19 पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा