Breaking

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

*जयसिंगपूर महावितरणास मनसेने दिला इशारा*


मनसे पदाधिकारी निवेदन देताना

*रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी*


जयसिंगपूर शहर,उदगाव व धरणगुत्ती तसेच आजूबाजूच्या परिसरातील वीज बिले ही वीज बील भरायच्या शेवटच्या तारखेच्या 2 दिवस आधी नागरिकांना दिली जातात,शासन नियमाप्रमाने वीज बील अखेरच्या तारखेच्या आधी किमान आठ दिवस देणे बंधनकारक असताना ते बिल एक ते दोन दिवस आधी नागरिकांना मिळत असून वीज ग्राहकांना दहा ते तीस रुपये जास्तीचा दंड भरावा लागत आहे, बिल वाटप टेंडर व्यक्ती किंवा कंपनीच्या चुकीच्या कारभाराचा त्रास व आर्थिक भुर्दंड नागरिकांनी का सहन करावा ? असा प्रश्न विचारत मनसे पदाधिकारी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

      सदरची वीज बिल वाटप पुढील महिन्यापासून किमान आठ दिवस आधी वाटत करण्यात यावे, जर असे नाही झाले तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल याची महावितरणने नोंद घ्यावी असे शिरोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जयसिंगपूर महावितरनास इशारा देण्यात आला,याबाबतचे निवेदन जयसिंगपूर उपकार्यकारी अभियंता कडाळे यांना देण्यात आले, 

      याप्रसंगी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे,जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश उर्फ लखन भिसे, मनवासे जिल्हा संघटक संजय भंडारे,माजी शिरोळ तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,शहर सचिव सूरज बुरांडे,मनससे शहराध्यक्ष महेश पोरे, धरणगुत्ती सो.मीडिया अध्यक्ष रोहित जाधव यांसह महाराष्ट्र सैनिक व महावितरणचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा