Breaking

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

उदगाव टेक्निकल हायस्कूल


हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी


डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       प्रारंभी हिंदी विभाग प्रमुख सौ. एच. व्ही. माने यांनी हिंदी दिनाची सप्तसूत्री, प्रतिज्ञा याची माहिती सांगून सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांच्या कडून करवून घेतली. करुणा सासणे व अपेक्षा कांबळे या विद्यार्थिनींनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. जंगम, पर्यवेक्षक आर. एम. मोरे यांनी मनोगत व्यक्त करून हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा असून यामधून राष्ट्रीय एकात्मता साध्य होते असे सांगितले. सौ. एच. व्ही. माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच आर. बी. शिकलगार यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा