![]() |
जयसिंगपूर पोलीस ठाणे |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयांना जेरबंद करण्यात पोलीसांना मोठं यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूदध गु.र.नं.280/2021 कलम 380,454 व 457 प्रमाणे आणि गु.र.नं.341/2021 कलम 380 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याप्रमाणे जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून संशयित आरोपी 1)शेखर प्रभाकर गायकवाड आणि 2)आकाश पांडुरंग काळे दोघे रा.संभाजीनगर,नांदणी रोड,जयसिंगपूर यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी जयसिंगपूर शहरात घरफोडी केलेबाबत कबुली दिली आहे.
सदर संशयित आरोपीकडून चोरी केलेल्या भारत गॅस कंपनीच्या 03 गॅस सिलिंडर टाक्या र.रू.4500/रू.किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही संशयित आरोपींना मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टामधे हजर केले असता मे.कोर्टानी सदर आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडीचा आदेश पारित केलेला आहे. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बलकवडे ,अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर वैजणे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के साहेब यांचे मार्गदर्शनानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस.ना.सागर सुर्यवंशी, म.पोलीस.ना.कांबळे मॅडम,म. पो.ना.बने मॅडम, पो.काॅ.शेटे , पो.काॅ.डावाळे,पो.काॅ.अवघडे, पो.काॅ.भोसले, पो.काॅ.सुर्यवंशी आणि पोलीस.काॅ.पठाण इत्यादींनी केली आहे.
सदरच्या कारवाईमुळे सराईत चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या आहेत.सदर कारवाईमुळे शहरात पोलीसांचे मोठे कौतूक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा