मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
शिरोळ :प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नाही.शिक्षणाबरोबर समाज श्रेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन रोटरी क्लब शिरोळने आणखी बळ दिले आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ शिरोळ यांच्या वतीने शैक्षणिक श्रेत्रात उल्लेखणीय कार्य केलेल्या शिक्षकांना स्व.बी.ए.माणगांवे यांचे स्मृतिपित्यर्थ नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.टारे क्लब हाऊस येथे कार्यक्रम झाला.आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.अध्यक्षस्थानी रोटेरीचे डीजीई नासिर बोरसादवाला होते.याप्रसंगी जि.प.च्या शिक्षण सभापती रसिका पाटील, दलितमित्र जिल्हापरिषद सदस्य डॉ.अशोकराव माने, उद्योजक भरत माणगांवे, गटशिक्षणाधिकारी दिपक कामत, रुस्तुम मुजावर ,डॉ.सुहास जोशी, डॉ.हिदूराव संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांरभी दीपप्रज्वलन व फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक ढवळे यांनी केले.स्वागत चितांमणी गोंदकर यांनी केले.यावेळी सत्कारमूर्ती किशोर शिंदे , रूपाली भगाटे ,वैशाली बोरचाटे , गुलनाझ बागवान ,दत्तात्रय गायकवाड, सहदेव केंगाळे ,सुशांत आंबी ,भरत सावळवाडे , सुवर्णा जाधव ,श्रीशैल्य मठपती ,सचिन पाटील-कणंगलेकर यांना नेशन बिल्डर अँवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब शिरोळला सात पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी अध्यक्ष पंडीत काळे व सुरेश पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अविनाश टारे, बापूसो गंगधर,श्रीकांत शिरगुप्पे ,शरद चुडमुंगे, अंगराज माने, अतुल टारे, प्रताप देसाई ,रावसाहेब जाधव , विठ्ठल पाटील ,धैर्यशील पाटील, प्रविण कनवाडे,आबा जाधव,संजय गावडे यांच्यासह रोटरीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखा गायकवाड तर रोटरीचे सचिव सचिन देशमुख यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा