Breaking

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

बस चालकाची मुलगी झाली आय ए एस अधिकारी ; निवडक गोष्टींना प्राधान्य देत प्रीती हुड्डाने केलं यश संपादन

 

आय ए एस अधिकारी, प्रीती हुड्डा


   दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाची अर्थात आय ए एस परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजली जाते. मात्र ध्येयाने प्रेरित होऊन हे अंतिम उद्दिष्ट गाठता येतं.एखाद्या गोष्टीचा ध्यास असा काही मनी बाळगा की वाटेतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला ध्येय्यपूर्तीच्याच दिशेनं नेईल. अशीच काहीशी  १०० टक्के यशस्वी झालेली हरियाणा येथील बहादुरगढमध्ये राहणारी प्रिती हुड्डा हिच्या जीवनाला मिळालेली कलाटणी याचीच प्रचिती देत आहे. खरं म्हणजे इंग्रजीचा बागुलबुवा करून आपण यशस्वी होऊ शकणार नाही अशा प्रकारची धारणा या परिक्षेला सामोरे जाणाऱ्या स्पर्धक विद्यार्थ्याचे असते. मात्र यावर मात करीत हिंदी माध्यमातून  लेखी परीक्षा आणि प्रकट मुलाखतीची फेरी पार करत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची कमाल केली आहे. 

      प्रितीला यानंतर आयएएससाठी निवडण्यात आलं. तिचे वडील दिल्ली परिवहन निगम (DTC) मध्ये बस चालक म्हणून सेवेत होते. आपली मुलयी आयएएस अधिकारी झाल्याचं कळालं तेव्हाही ते याच सेवेत कार्यरत होते. 

       जेएनयूतून शिक्षण प्रिती हुड्डा हिला इयत्ता दहावीमध्ये 77 टक्के आणि बारावीमध्ये 87 टक्के गुण होते. यानंतर दिल्लीतीलच लक्ष्मीबाई महाविद्यालयातून तिनं हिंदीतून पदवी शिक्षण घेतलं. ज्यामध्ये तिला 76 टक्के गुण मिळाले. यानंतर तिनं जेएनयू विद्यापीठातून हिंदीतुन एम.फिल. आणि पीएच.डी.चं शिक्षण घेतलं. 

    बीबीसीशी संवाद साधताना आपण कधी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करु अशी अपेक्षाही केली नसल्याचं प्रितीनं सांगितलं. कुटुंबातून इतकं शिक्षण घेणारी प्रिती पहिलीच मुलगी. वडिलांचं स्वप्न होतं की त्यांच्या मुलीनं आयएएस अधिकारी व्हावं, पुढे विद्यापीठातून शिक्षण घेताना प्रितीला परीक्षेच्या तयारीसंबंधीची माहिती मिळाली, ज्यानंतर तिनं तयारी सुरु केली. 

      UPSC च्या परीक्षा म्हटलं की 12 तास अभ्यास वगैरे अशीच एक धारणा तयार झाली आहे. पण, प्रितीनं याला शह दिला. सातत्यानं 10-12 तास अभ्यास करण्याऐवजी एक दिशा ठरवून त्या रोखानं अभ्यास करण्याची गरज आहे, असा विचार करणाऱ्यांपैकी प्रिती एक. परीक्षेच्या अभ्यासासोबतच दंगामस्तीही तितकीच गरजेची आहे, चित्रपट पाहणंही गरजेचं आहे असं म्हणज प्रितीनं आत्मविश्वासानं हळूहळू तयारी सुरु केली. पुस्तक वाचनाचा मारा करण्याऐवजी तिनं निवडक गोष्टींना प्राधान्य देत त्याच दिशेनं अभ्यास सुरु केला आणि अतिशय सहजपणे आयएएस होण्याचं हे शिखर गाठलं.

          प्रीती हुड्डा यांच्या यशाने तमाम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रकारची स्फूर्ती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा