प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदगाव ता शिरोळ जि.कोल्हापूर येथील मायाका धाब्याजवळ अवैध दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांकडून धाड टाकून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि.11/09/2021 रोजी अकिवाटे एम.आय. डी.सी.,उदगाव हद्दीत मायाका धाब्याच्या अडोशास उघड्यावरच संशयित आरोपी अंकुश विष्णू भोरे वय 53 रा.यादवनगर जयसिंगपूर हा स्वतःच्या फायदयाकरीता बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी दारू विकताना आढळला. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून तो दारूचा माल विक्री करीत असताना रू.1793/च्या प्रोहीबीशनचे साहीत्यासह व रोख रक्कमेसह मिळून आल्याने सदर आरोपीचेविरूदध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65ई प्रमाणे फिर्यादी संदिप हणमंत बाडे पो.ना.यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीकडून रेठरा,टॅगोपंच व जी.एम. डॉक्टर कंपनीच्या देशी दारूसह,र.रू.260/रूपयाच्या भारतीय चलनी नोटा असे एकूण 1793/रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या धडक व सदर कारवाईमुळे जयसिंगपूर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा