Breaking

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

शिरढोण मध्ये लालबावट्याच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान ; कोरोनाला डोक्यात घेऊ नका,कोरोनाशी लढा : मा.पापालाल सनदी

 

लाल बावट्याच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी


 शिरढोण : कोरोना हा जरी रोग असला तरी त्याला डोक्यात घेऊ नका, त्याला थांबविण्यासाठी नियमांचे पालन करा असे मत पापालाल सनदी यांनी लाल सेना बांधकाम कामगार संघटना (आयटक) महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन व शिरोळ तालुका शहराध्यक्ष हैदरअली मुजावर पुढाकाराने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या  कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे पापालाल सनदी बोलत होते.अध्यक्षस्थानी कॉम्रेड हनंमत लोहार होते.   

       मुश्किले आसान दर्गा मंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित प्रमुखांच्या हस्ते आशा वर्कस,अंगण वाडी सेविका,प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी,वजीर रेस्क्यू फोर्स,आधार रेस्क्यू फोर्स,हेल्पिगं हँड फोर्स,पत्रकार,डॉक्टर्स,पोलीस दल,ग्रामपंचायत कर्मचारी,महावितरण कर्मचारी आदींचा यावेळी प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

     यावेळी स्वागत व सूत्रसंचालन डॉ. कुमार पाटील यांनी केले.कॉ.महेश लोहार (जिल्हा सचिव) कॉ.मारुती आजगेकर ,कॉ.शशिकांत सदलगे कॉ. माणिक हरिहर, नागेश काळे, ललिता जाधव , विश्वास बालिघाटे, पत्रकार दिलीप कोळी,रसूल सय्यद,अविनाश पाटील, रावसाहेब बिरोजे, सुरेश कोरे, रमजान मुजावर, रब्बानी मुल्लाणी,उस्मान मुजावर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी  आपले मनोगते व्यक्त केली.

       लाल बावटाच्या वतीने समाजासाठी सुरक्षेसाठी झटणाऱ्या या कोरोना योद्ध्यांचा केलेला सन्मान हा स्तुत्य आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा