Breaking

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

जैनापूरमध्ये बोअरवेल्सची जलपूजा व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

 



प्रा. मेहबूब मुजावर : जैनापूर प्रतिनिधी


     जैनापूर  गावामध्ये डॉ.राधाकृष्णन् यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त बोअर जलपूजा व देणगीदार सत्कार  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विद्यासागर अडगाणे उपस्थित होते.


     जैनापूरच्या कुमार विद्या मंदिर  शाळेतील पट संख्या १७ विद्यार्थी वरून ९६ पर्यंत वाढवण्याचं काम  शिक्षकांनी करून मोठं योगदान दिले आहे. शाळेच्या विकासासाठी गावातील माजी विद्यार्थी व गावकरी सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून जैनापूर गावकऱ्यांनी शाळेच्या आवारात बोर  मारून दिला आहे मात्र बोरवेल्ससाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था रोटरी क्लब अप जयसिंगपूरने केली आहे. या नवीन बोरच्या उद्घाटन कार्यक्रमसाठी रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे अध्यक्ष व जयसिंगपूरचे नूतन नगरसेवक मा.विद्यासागर अडगाणे होते. ते म्हणाले की, सामाजिक कार्याचा भाग म्हणून गावातील सर्व पालक व तसेच माजी विद्यार्थी स्वतः शाळेत आपल्या कुवतीप्रमाणे योगदान देत असतात.  शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी धडपडत असतात हे या शाळेच्या व गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. पुढे ते म्हणाले शाळेचे मुख्याध्यापिका सौ.उषा सुतार, श्री. कांबळे सर व  पाटील मॅडम यांचेही काम मोलाचे व मोठं असून त्यांचे कौतुक केले.

     तसेच शाळा विकासासाठी योगदान दिलेल्या देणगीदार व इतर घटकांचे सर्वांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे केंद्र प्रमुख मा.श्री मेघन देसाई, जैनापूर गावचे नूतन  उपसरपंच आनंदा बिरजे व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती ,उपस्थित होते. आणि या कार्यक्रमासाठी मंडप डेकोरेशन एक दिवस भर मा श्री. फिरोज मुजावर यानी करून  दिले.

  श्री गिरीष बशिट्टी यांनी  सूत्रसंचालन केले मा. सौ. उषा मॅडम यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा