Breaking

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा देताना आलेल्या तांत्रिक अडचणी बाबत माहिती सादर करणेबाबतचे आवाहन : मा.गजानन पळसे,प्र.संचालक

 

मा. गजानन पळसे,प्र.संचालक


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


      मार्च / एप्रिल २०२१ या उन्हाळी सत्रातील विद्यापीठा मार्फत आयोजित परीक्षा दि. १०/०८/२०२१ पासून ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्या आहेत. तथापि ऑनलाईन परीक्षा देताना तांत्रिक कारणास्तव काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. याबाबत खालील प्रमाणे कळविण्यात येत आहे.


१. विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव १०, ऑगस्ट, २०२१ पासून ते मार्च / एप्रिल २०२१ या उन्हाळी सत्रातील

परीक्षा संपेपर्यंत पेपर देता आला नाही अशा पेपरची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील लिंकव्दारे त्यांची माहिती / तपशील ऑनलाईन पध्दतीने प्रणालीत सादर करावे.

२. सदरची लिंक दिनांक ०६/०९/२०२१ पासून ०९/०९/२०२१ रोजी रात्री ८ :०० वाजेपर्यंत चालू राहिल. unishivaji.ac.in/online.unishivaji.ac.in या वेबसाईट पोर्टलवर

Link - Application for re-examination March/April 2021

     मार्च / एप्रिल २०२१ साठी परीक्षा अर्ज भरलेल्या तसेच परीक्षा देताना आलेल्या तांत्रिक अडचणी मुळे पेपर देता न आलेल्या बी.ए., बी.कॉम., बी. एस्सी. व इतर सर्व अभ्यासक्रमाशी निगडीत सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षक व परीक्षा कामकाज पाहणा-या कर्मचाऱ्यांनी सदरची बाब निदर्शनास आणावी. 

     तसेच सदर परीपत्रक प्रथम वर्ष महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणा-या परीक्षा व क्लस्टर मार्फत घेण्यात येणा-या परीक्षा ( अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वास्तुविशारद, शिक्षणशास्त्र व्यवस्थापन अभ्यासक्रम, विधिअभ्यासक्रम ) वगळून आहेत याची नोंद घ्यावी.अशा प्रकारची माहिती परिपत्रकाद्वारे मा.गजानन पळसे,प्र.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा