प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील संभाजीनगर झोपडपट्टी येथे पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित आरोपींचेविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित केले असताना दि 29/08/2021 रोजी दुपारी 20 वा.सुमारास आरोपी 1)युनुस सय्यद ढालाईत रा.शिरोळ 2)सुनिल दादासो फलले रा.शिरोळ 3)कुबेर नेमगोंडा पाटील रा.कोथळी 4)जगदीश सदानंद शेट्टी रा.शाहूनगर जयसिंगपूर 5)गुरापा सिद्राप्पा हडपद रा.संभाजीनगर जयसिंगपूर 6)सदाशिव आण्णापा गाडीवडर रा.डेबाॅनस चौक जयसिंगपूर 7)गणेश रामचंद्र पवार रा 11 वी गल्ली जयसिंगपूर 8)देवाप्पा बाबूराव माने रा.शाहूनगर जयसिंगपूर 9)रमेश दशरथ कलकुटगी रा.ग.नं.12 जयसिंगपूर आणि 10)यलापा कल्लोळी पाथरवट रा.संभाजीनगर जयसिंगपूर इत्यादी संशयित आरोपी होते.
हे संशयित आरोपी विनामास्क तसेच कोव्हीड 19 च्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना न राबवता, हयगयीने आणि निष्काळजीपणाने एकत्र जमले होते.यातील अं.न. 5 हा जुगार अड्ड्याचा मालक असून त्याने त्याच्या मालकीच्या घरामध्ये आरोपी नं 1ते 4 व 5 ते 10 यांचेसह पत्त्याच्या पानावर पैसे लावून रमी नावाचा हारजीतीचा खेळ खेळत असताना मिळून आलेने त्यांच्याविरुद्ध जुगार अधिनियमांतर्गत व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दि.04/09/2021 रोजी पोलीस ना.चव्हाण साहेबांनी फिर्यादी मगदूम यांच्या फिर्यादीवरून दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, 7 नग व पत्त्याची पाने व जुगाराचे साहीत्य तसेच चारचाकी व दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेले आहेत. सदर गुन्हयाचा तपास हा म.पो. ना.बने करत आहेत.
पोलिसाच्या या धडक कारवाईमुळे या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा