हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करीत असताना काही निर्बंध घातलेले असून त्यानुसार मंडळाने तंतोतंत नियमांचं पालन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. परंतु कोल्हापूरात गणपती आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. मंडळाचे संस्थापक माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला बंदी असतानासवाद्य मिरवणूक काढल्याने मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह ढोल-ताशा पथकातील कलाकारांचाही समावेश आहे.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात पुन्हा एकदा आव्हान केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा