प्रा.अमोल सुंके :अकिवाट प्रतिनिधी
अकिवाट : कोरोनाच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या सर्वच आशा स्वयंसेवीकांच योगदान अगदी वाखाण्याजोगे आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अकिवाट येथील छावा ग्रुपतर्फे गावच्या आरोग्य सेवा उपकेंद्रात काम करणाऱ्या सर्व आशा सेविकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा आणि आपल्या प्रिय-जनांचा जीव धोक्यात घालून मैला-मैलांची पायपीट करत कोरोना सर्व्हे करणे ,लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्य परिस्थितीची चौकशी करणे ,औषध देणे ,कोरोना लसीकरणाला आलं नाही तर त्यांना फोन करून बोलवून घेणे ही सर्व कर्तेव्ये निस्वार्थीपणे आणि तूटपुंज्या मोबदल्यात पार पाडण्याचे काम अकिवाट आरोग्य सेवा उपकेंद्राच्या आशा सेविकांनी केलं आहे.
पण जितका सन्मान त्यांना मिळायला हवा होता तितका मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत छावा ग्रुप ,अकिवाट यांनी आपल्या मंडळाच्या गणपतीच्या पहिल्या आरतीचा मान त्यांना दिला, त्याच बरोबर सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाप्रसंगी आशा सेवकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि छावा ग्रुपने दाखवलेल्या कृतज्ञतेबद्दल आभार ही मानले.
कार्यक्रमा प्रसंगी छावा ग्रुपचे मार्गदर्शक नेमिनाथ रायनाडे, अकिवाट येथे सेवा बजावणारे सर्व आशा सेविका ,आरोग्य सेवक , डॉ.रामचंद्र चोथे, बसगोंडा आवटी, संतोष पिंपळे, छावा ग्रुपचे सर्व युवक तथा नागरिक उपस्थित होते.
छावा ग्रुपने समाजातील या कोरोना योद्ध्यांचे सत्कार करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा