![]() |
मा. गजानन पळसे, प्र.संचालक |
प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील मार्च /एप्रिल २०२१ च्या परीक्षा दि.१० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु झाल्या असून आज दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी B.Sc./M.Sc. (Nano Sc. and Technology) या अभ्यासक्रमाची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. तसेच काही तांत्रिक कारणास्तव विद्यापीठाच्या परीक्षा न देवू शकलेल्या विद्यार्थ्यासाठी त्यांची पुनर्रपरीक्षा आज दि. १६ सप्टेंबर २०२१ पासून सुरु झाली.
आजच्या या परीक्षेसाठी विद्यापीठाची नियमित परीक्षा व पुनर्परीक्षा मिळून ३१६२ विद्यार्थ्यापैकी २९७२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. ऑनलाईन परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचण उद्भवू नये यासाठी तांत्रिक अडचणीचे निराकरण करणेसाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती.
आज दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी एकुण ३२ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले व आजपर्यंत एकुण १७३ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.
तसेच ज्याची परीक्षा सुरु झालेली नाही त्यांना मॉक टेस्ट सत्वर द्यावी म्हणजे मुख्य परीक्षेत तांत्रिक अडचणी
येणार नाहीत असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यांनी महाविद्यालयास केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा