Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

*जांभळीतील गणेशोउत्सव शांतता बैठकीत सामाजिक संवेदनशीलता व शासन नियम पाळण्याचे आव्हान : पो.नि.दत्तात्रय बोरिगिड्डे*

 

मौजे जांभळी 


 *जांभळी प्रतिनिधी - शशिकांत घाटगे*


         शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्यावतीने जांभळी येथे गणेश चतुर्थी निमित्त शांतता बैठक घेण्यात आली. कोरोनाचे सावट अजून असल्यामुळे गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा 'एक गाव एक गणपती' संकल्पना करून स्थापन करावे.गणपती आगमन व विसर्जन हे एकदम साध्या पद्धतीने साजरी करावे, गर्दी करण्याचे टाळावे, गणेशोत्सव काळात होणारा खर्च हा गावच्या विकासासाठी, गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून चोरी चुकीच्या घटना घडणार नाहीत. तसेच शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना मदत करावी  असे आव्हान कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले.


   स्व. माजी आमदार अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सभाग्रह जांभळी येथे बैठक घेण्यात आली.अध्यक्षस्थानी बाबगोंडा पाटील ज्येष्ठ नागरिक  हे होते.स्वागत गावकामगार पोलीस पाटील राजीव कांबळे यांनी केले. मनोगत जयपाल कांबळे ग्रामपंचायत सदस्य व के आर चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी जांभळी गाव हे शांतताप्रिय आहे गावातील कार्यक्रम हे चांगल्या पद्धतीने एकोप्याने प्रशासनाला सहकार्याची भावना ठेवून साजरे केले जातात आम्ही सर्व मिळून गणेशोत्सव पार पाडू असे वक्तव्य केले.

 आरोग्य, जाहिरात

     मा. दत्तात्रय बोरिगिड्डे पोलीस निरीक्षक शिरोळ पोलीस स्टेशन यांचा सत्कार श्रीधर फारणे उपसरपंच यांनी केले.तसेच मा.सुळ साहेब पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार के आर चव्हाण यांनी केले.बीट अंमलदार पोलीस सुनील पाटील, माने,ओंबासे यांचा सत्कार जयपाल कांबळे, शाम जाधव व दत्तात्रय कदम समाज कार्य न्युज संपादक यांनी केले

   कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबगोंडा पाटील यांनी  आपल्या गावामध्ये कोरोनाचे पेशंट जरी नसले तरी आपण ह्या गणेशोत्सवामध्ये सर्व नियम पाळून कोरोना संक्रमण होऊ नये त्याची काळजी घेऊन अगदी शांततेत सण-उत्सव पार पाडू असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.शांतता बैठकीमध्ये ग्रामसेवक एच एम जाधव, गावातील गणेशोत्सव तरुण मंडळे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विकास यादव, बसगोंडा पाटील,सर्जेराव जाधव, शशिकांत घाटगे  व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सदर कार्यक्रमाचे निवेदन आदर्श शिक्षक शाम पाटील सर यांनी केले व आभार अध्यक्ष बाबगोंडा पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा