Breaking

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

अंधश्रद्धेचा कहर! पाऊस पडावा म्हणून बेडकाला दोरीला उलटं टांगलं अन् मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं

 




        चांगला पाऊस पडावा यासाठी बेडकांना दोरीला उलटं टांगून व लहान मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं गेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यातील बनिया या गावातून समोर आली आहे. 


      यावर्षी बराच कमी पाऊस झाला व शेतातील पिकं डोळ्यादेखत खराब झाल्यामुळे गावकऱ्यांनी जिल्ह्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी परंपरेनुसार चालत आलेल्या काही प्रथा सुरू केल्या आहेत. 




    लहान मुलींना निर्वस्त्र करून गावातून फिरवल्यास पाऊस येतो या अंधश्रद्धेतून गावातल्या महिलांनी हे कृत्य केल्याची बातमी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीने दिले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने या प्रकरणी दमोहच्या कलेक्टरला नोटीस पाठवली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली लहान मुलींसोबत केल्या गेलेल्या या प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा