Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

*जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाकडून सराईत चोरट्याना केलं जेरबंद*


जयसिंगपूर पोलीस स्टेशन

प्रविणकुमार माने : उपसंपादक


     ल.क.अकिवाटे MIDC उदगांव ता. शिरोळ येथील मोटारसायकल चोरीतील सराईत चोरट्यांना पकडण्यास जयसिंगपूर गुन्हे शोध पथकास यश आलेले आहे.आरोपीकडून 5 मोटारसायकली व गुन्हयात वापरलेले मोटारसायकल असा एकुण 1,50,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.

      याबाबत अधिक माहिती अशी की,  जयसिंगपुर पोलीस ठाणे  गु.र.नं.338/2021 ने भा.दं.वि.सं.कलम 379 प्रमाणे दि.04/05/2021 रोजी गुन्हा दाखल करणेत आला होता. जयसिंगपुर गुन्हे शोध पथकाकडील अमंलदार यांनी सदर गुन्हयाचे तपासामध्ये सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करून त्यातील संशयीत आरोपी इसम रियाज लियाकतअली खान व.व.19 रा.ज्ञानगिरी वसाहत सावळी कुपवाड ता.मिरज जि.सांगली यास व त्याचे दोन विधीसंघर्ष बालक साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले.

       त्यांचेकडे सखोल तपास करुन संशयित आरोपींनी  जयसिंगपूर, सांगली ग्रामीण व सांगली शहर तसेच इतर ठिकाणच्या त्यांनी मोटारसायकली चोरी केलेची कबुली दिली व चोरीच्या मोटार सायकली आरोपी नामे रियाज लियाकत अली खान याचेकडुन नंबरप्लेट नसलेल्या चोरीतील 5 मोटारसायकली व गुन्हयात वापरलेली 1 स्पेलेंडर मोटारसायकल असा एकुण ₹ 1,50,000/- किमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन तो हस्तगत केला आहे.

      आरोपी रियाज लियाकतअली खान यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयसिंगपुर यांचेसमोर हजर केले असता त्यास 02 दिवसांची पोलीस कस्टडी देणेत आली आहे.सदर आरोपींकडून चौकशीअंती जयसिंगपुर पोलीसठाणे, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आणि सांगली शहर पोलीस इत्यादी ठिकाणी गु.र.नं 341/2021,51/2021, 327/2019 ने भा.दं.सं. कलम 379 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 

          सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री शैलेश बलकवडे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग श्री रामेश्वर वैजणे सो, मा:पोलीस निरीक्षक  राजेंद्र मस्के जयसिंगपूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील पो.ना.567 सागर सुर्यवंशी, पो.ना.1011 बाबाचाँद पटेल, पो.ना. 179 सागर मगदुम, पो.कॉ. 885 संदेश शेटे, पो.कॉ. 1333 रोहीत डावाळे, पो. कॉ. 2385 अमोल अवघडे, पो.कॉ.2428. शशिकांत भोसले, पो.कॉ.2545 वैभव सुर्यवंशी व पो. कॉ. 843 जावेद पठाण यांनी केली आहे.

   सदर कारवाईमुळे पोलीसांचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा