![]() |
नामदार मा.हसन मुश्रीफ व मा.राजेंद्र पाटील यड्रावकर |
गीता माने : सहसंपादक
आज शनिवार दि.11 सप्टेंबर 2021 रोजी जयसिंगपूर येथे मर्चंट असोसिएशनमध्ये बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजनेचे शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्याण व ग्राम विकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
![]() |
कार्यक्रमातील काही महत्त्वपूर्ण छायाचित्रे |
या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी मा.राहुल रेखावर,कामगार आयुक्त पुणे मा.शैलेंद्र पोळ,कामगार उपयुक्त इचलकरंजी मा.श्री.गुरव, कामगार नेते मा.मिश्रीलाल जाजू हे मान्यवर उपस्थित होते.
![]() |
कामगार नेते कॉम्रेड रघुनाथ देशिंग |
या प्रसंगी नामदार हसन मुश्रीफ साहेब म्हणाले की ,बांधकाम कामगार हितार्थ हा कार्यक्रम घेऊन कामगाराच्या कल्याणाचा विचार महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तसेच भविष्यात ही कामगार हितार्थ व कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे अशा प्रकारे आश्वासित केले. कॉम्रेड रघुनाथ देशिंगे म्हणाले,बांधकाम कामगारांच्यासाठी योजना चांगल्या आहेत परंतू 100 टक्के त्याची अंमलबजावणी करावी.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कामगारा प्रति जे काही उत्तम करता येईल ते करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.
या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या कामगारांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात नामदार हसन मुश्रीफ व नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते भोजन वाढण्यात आले. उर्वरित सर्व बांधकाम कामगार व इतर कामगारांना मध्यान्ह भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी जयसिंगपूर इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र देसाई,इंजि.श्री.नितिन पाटील,इंजि.अख्तर नालबंद, कॉम्रेड.श्री.रघुनाथ देशींगे,श्री.कुलकर्णीव इतर मान्यवर उपस्थित होते.
या कामगार कल्याणकारी योजनेमुळे समस्त कामगार वर्गात समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा