![]() |
पर्जन्यमान |
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी असल्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम
राज्यात पावसाचा जोर कायम असून गुरूवारपर्यंत हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह कोकण व मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.ळे
यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम आणि वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे त्याचा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्याटप्प्याने प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा