![]() |
मा.गजानन पळसे,प्र.संचालक |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभाग तसेच संलग्नित महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मशील पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीची पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचे आयोजन दि.११, १२, १३ व १५ सप्टेंबर २०२१ रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व बेळगाव या जिल्ह्यातील एकुण ११ परीक्षा केंद्रावर करण्यात आले आहे.
आज दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी एम.एस्सी. ऑरगॅनिक / फिजिकल / अनलिटीकल), एम.एस्सी. केमिस्ट्री (इंडस्ट्रीयल / अॅप्लाईड / इनऑरगनिक / (मायक्रोबायोलॉजी / फार्मासिटीकल मायक्रोबायॉलॉजी / इंडस्ट्रियल मायक्रोबायॉलॉजी / अप्लाईड मायक्रोबायॉलॉजी), एम.एस्सी. मेमेटिक्स, एम.एस्सी, झुलॉजी, एम. एस्सी – फिजिक्स इ. अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पडल्या यासाठी आज एकूण ६८२५ विद्यार्थ्यांपैकी ५८८० इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली प्रवेश परीक्षेस उपस्थित राहण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाणे हे शेकडा ८६.२४ टक्के इतके होते. सदरची परीक्षा हो तीन सत्रामध्ये सुरळीतपणे पार पडली.
आज पार पडलेल्या परीक्षेपैकी एम. एस्सी केमिस्ट्री या विषयासाठी ४५५९ विद्यार्थ्यांपैकी ४०१० इतक्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
काही तांत्रिक कारणास्तव विद्यापीठाच्या परीक्षा न देवू शकलेल्या विद्यार्थ्यासाठी त्यांची पुनरंपरीक्षा पुंणार0 घेण्यासाठी दि.९ सप्टेंबर २०२१ अखेर विद्यार्थ्यांना लिक उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार एकूण ८८४५ लिंकद्वारे पुनरंपरीक्षा घेण्याबाबतची माहिती विद्यापीठास कळविली आहे.
या विद्यार्थ्यांची पुनरंपरीक्षा दि.१६ सप्टेंबर २०२१ पासून घेण्याचे विद्यापीठ प्रशासनाने प्रयोजले आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी त्याबाबतची माहिती व सूचना विद्यार्थ्यांना त्वरित समजाव्यात यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ स्वतःचा ईमेल तसेच नोंदणीकृत मोबाईल वारंवार पाहून पुढील कार्यवाही करावी.
तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झालेली नाही त्यांनी मॉक टेस्ट सत्वर यावी म्हणजे मुख्य परीक्षेत तांत्रिक अडचणी येणार नाहीत असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री. गजानन पळसे यांनी महाविद्यालयास केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा