![]() |
संग्रहित |
पुणे : पिंपरी - येथील एका विवाहितेला मूल होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अघोरी अंधश्रध्देला सामोरे जावे लागत असल्याचे उघड झाले आहे. ज्यामध्ये विवाहितेला कोंबडीचे रक्त ही प्यायला लावले होते. सहनशक्ती संपल्यावर विवाहितेने पती अमित वाघुले , सासरे सुदाम वाघुले व सासू संध्या वाघुले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
कहर म्हणजे, विवाहितेचा पतीच लैंगिकदृष्ट्या अक्षम असल्याचे घरच्यांना माहीत असूनही विवाहितेवरच जाच केला गेला. शिवाय विवाहितेच्या कुटुंबीयांनी लग्नाआधी मुलगा इंजिनियर असल्याचे सांगून फसविले होते.
चौकशीत जादूटोणा करणारा कनेरसर (ता. खेड, जि. पुणे) येथील बुवाचा हात या घटनेत आढळल्यानंतर त्यालाही आरोपी करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा