Breaking

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रा. तोहित मुजावर, नगरसेवक मुसा डांगे व सागर अडगाणे यांचा सत्कार संपन्न

 

प्रा.तोहिद मुजावर, नगरसेवक मुसा डांगे व सागर आडगाणे


मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक


    जयसिंगपुरात स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेले प्रा.तोहिद मुजावर, स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान झालेले संवेदनशील नगरसेवक मुसा डांगे व सागर अडगाणे यांचा यथोचित सत्कार संस्थेतर्फे करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अतिक पटेल व अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एजाज मुजावर होते.


        सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष एजाज मुजावर यांनी या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात ते म्हणाले, संस्था ही नेहमी विविध सामाजिक उपक्रमाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या सेवेत कार्यरत आहे.समाजाला उपयोगी पडणाऱ्या आदर्शवादी व्यक्तिमत्वांचा व घटकांचे  सत्कार करून त्याचा आदर्श व प्रेरणा समाजासमोर ठेवणे हा उदात्त हेतू आहे. 

      प्रा. तोहिद मुजावर यांची प्लेसमेंट ऑफिसर व करिअर कौन्सिलर च्या माध्यमातून केलेली शैक्षणिक  कामगिरीचा विचार करून  नवभारत संस्थेकडून आउट स्टॅंडिंग पर्सनॅलिटी इन एज्युकेशन सेक्टर म्हणून शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते त्यांचा प्रित्यर्थ हा सत्कार तसेच जयसिंगपूर नगरपालिकेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून कामाला प्राधान्य व समाजाविषयी संवेदनशील असणारे हाजी मा.मुसा डांगे व मा.सागर अडगाणे यांचा सत्कार शाल व फेटा व रोप देऊन सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.

       यावेळी सत्कार मूर्ती प्रा.तोहित मुजावर म्हणाले,यापुढेही शैक्षणिक कार्य असं चालू ठेवून समाजाची सेवा करणार आहे. तर नगरसेवक मुसा डांगे व सागर अडगाणे यांनी अल्पकाळात जेवढी समाजाची सेवा करता येईल ती पूर्ण करण्याचा मनोभावे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले.

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. अतिक पटेल म्हणाले, स्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्थेने केलेला काम कौतुकास्पद असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळेस समाजातील काही वास्तववादी उदाहरणाच्या माध्यमातून उपस्थितांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे काम केलं.

      या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख मा.तेजस कुराडे,मा.वजीर रेस्क्यू फोर्सचे अध्यक्ष मा.उफुक शानदार न्यूजचे संपादक अख्तर पटेल, जयसिंगपूर नगरीचे संपादक राजू सय्यद, शानदार न्यूजचे प्रतिनिधी हुसेन शेख, संस्थेचे पदाधिकारी ओम काळे, कुमार वैदू, प्रदीप लोंढे, सुरेश राठोड, फिरोज मुल्ला इत्यादी उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा