![]() |
आरोपीकडून जप्त केलेले पैसे |
देशभरात वारंवार हनी ट्रॅपच्या घटना समोर येत आहेत. त्यात अजुन एक भर पडली आहे, ज्यात दिल्लीच्या एका तरुण डॉक्टरला यवतमाळच्या एका पुरुषाने (संदेश मानकर )सोशल मीडियावर मुलगी असल्याचे भासवून तब्बल 2 कोटींचा गंडा घातला आहे.वेळीच तक्रार केल्याने आरोपीला यवतमाळ पोलीसांनी 24 तासात बेड्या घातल्या आहेत.
अशा प्रकारे घातला गंडा
दिल्ली येथील या डॉक्टरने 1 वर्षापूर्वी सोशल मीडियावरील एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर हळूहळू ओळख दाट मैत्रीत बदलली. दरम्यान हनी ट्रॅप करणाऱ्या आरोपी संदेश मानकर याने डॉक्टरला आपल्या बहिणीचे अपहरण झाल्याचे सांगून अपहरणकर्त्यांकडून बहिणीला सोडवण्यासाठी 2 कोटी घेतले आणि पुन्हा काही लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात डॉक्टरला पाठविण्यास सांगितले.
हे ही वाचा
एवढी मोठी रक्कम हाती लागल्यानंतर आरोपीने मोबाईल फोनसह सोशल मीडियावरील सर्व अकाउंट बंद केले आणि आता आपण फसलो हे दिल्लीच्या डॉक्टरला लक्षात येताच त्याने यवतमाळ पोलिसात धाव घेतली आणि यवतमाळ पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत 24 तासात आरोपीला जेरबंद केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा