Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

*जयसिंगपूर येथे दोघांवर जुगार अधिनियमांतर्गत कारवाई*



प्रविणकुमार माने : उपसंपादक


जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे पैसे लावून जूगार खेळ चालवित असलेने दोन संशयित आरोपींचेविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार दि.०७/०९/२०२१ रोजी १२.४५ वा. चे सुमारास गल्ली नं ०९ अशोक चौक जयसिंगपूर ता. शिरोळ येथे रॉयल सायकल दुकान समोर उघडयावर संशयित आरोपी 1)महादेव शंकराष्पा तलवार वय ४२ धंदा- मजूरी रा. गल्ली नं. ६ मादनाईक मळा जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर व 2) शिवराज आनंदराव पोवार वय.३८ रा. मु.पो. धरणगुत्ती ता. शिरोळ जि. कोल्हापूर (पाहिजे आरोपी) या संशयित आरोपीं आहेत. संशयित गुन्हेगार मटका बेटींग मालक व स्वताचे फायदयाकरीता बिगर परवाना बेकायदा लोकांचे कडून पैसे घेवून कल्याण मटका आकडयावर पैसे लावून जूगार खेळ चालवित असताना मिळून आलेने फिर्यादी रोहित डावाळे पो.काॅ.यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने त्यांच्याविरूदध दि. 07/09/2021 रोजी जुगार बंदी अधिनियमांतर्गत 14.27 वा.गुन्हा दाखल करून सदर गुन्हयाचा खबरी अहवाल मा. न्यायालयात पाठविण्याची तजवीज ठेवली आहे.

    सदर आरोपींकडून 

१)१२४० = ०० रु. त्यात ५००, १००,२०,१० अशा किंमतीच्या चलनी नोटा मिळून किं.स.२)०० =००रु. त्यात कल्याण मटका नावाची पांढ-या रंगाची चिठठी एक त्यावर दि. ०७/०९/२०२१ असे लिहून त्याखाली वेगवेगळे आकडे लिहीलेली किं.स.३) ०१ = ००रु. त्यात एक निळया शाईचा बॉलपेन एक चालू स्थितीत असलेला किं.स.असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

      सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास 

पो.ना. १०११ पटेल साहेब करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा