प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे एका ईसमाने अवैधरीत्या दारूची रिक्षातून वाहतूक व विक्री करताना येथील पोलीसांकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की,पोलीस अधीक्षकसो कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांनी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायावर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांनी पोलीस ठाणे शोध पथकातील अधिनस्त कर्मचाऱ्यांना अवैध व्यवसायावर कारवाई करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सदर कर्मचारी अवैध व्यवसायावर कारवाई करणेसाठी जयसिंगपूर शहरात पेट्रोलिंग करीत असतानाच पोलीस काॅ.अमोल अवघडे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की,सुजित बाळासो पाटील रा.7 वी
गल्ली, जयसिंगपूर हा प्रवासी रिक्षा क्र.एम.एच.09 जे 7938 या वाहनातून विनापरवाना, बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करीत आहे. पोलिसांनी सदर रिक्षाचा पाठलाग करून जनतारा हायस्कूल समोर कोल्हापूर रोडवरती रिक्षा अडवून त्याच्या रिक्षाची तपासणी केली असता त्यामधे ₹ 44,278 किंमतीचा ओल्ड मंक,इंग्लिश डाॅकटर ब्रॅडी ,ईमपेरियल ब्लू, राॅयल स्टॅग विसकी,किंगफिशर बिअर वगैरे विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत.सदर आरोपीविरुद्ध दारूबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून ₹ 44278 किमतीची विदेशी दारु व 1,20,000/किंमतीची तीन चाकी रिक्षा इ.मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमधे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या आदेशाने पोलीस नाईक बाळासाहेब चव्हाण, पो.काॅ.भातमारे, पो.काॅ.अवघडे आणि पो.काॅ.रोहित डावाळे इ.नी भाग घेतलेला होता.
सदर कारवाईमुळे जयसिंगपूर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा