गणेश कुरले : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : समाजवादी प्रबोधिनी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती जयसिंगपूरच्या वतीने कालवश पत्रकार गौरी लंकेश यांचा ४ था स्मृतिदिन व साळवे यांची जयंती निमित्ताने स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.चिदानंद आवळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रारंभिक प्र.प्राचार्य डॉ.वाय.एन. चव्हाण मनोगत व्यक्त करताना म्हणाले, गौरी लंकेश हे निर्भिड पत्रकार व कन्नड साहित्यिक म्हणून त्यांनी आपला लेखणीच्या व लंकेश पत्रिकेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा वेगळा ठसा उमटविला होता परंतु प्रतिगामानी त्याला विरोध करून त्याचा खून केला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
डॉ.चिदानंद आवळेकर म्हणाले की, अशा निर्भीड व लढाऊ कार्यकर्त्यांचा खून करून जाणीवपूर्वक चळवळी थांबविणे किंवा दिशा बदलण्याचे काम केले जाते. तसेच क्रांतिकारी मुक्ता साळवे यांनी आमचा धर्म कोणता?न्यायाधीशाला असा प्रश्न विचारून क्रांतिकारक विचारांची चिंगारी पेटवली. आज त्यांच्या विचारांचे अभिसरण नवयुवकांच्या मध्ये झालं पाहिजे.
राष्ट्र सेवा दल संघटक बाबासाहेब नदाफ हे याप्रसंगी म्हणाले, सवडीनुसार चळवळ होऊ शकत नाही, त्यासाठी उत्तम कार्यकर्ता व लेखणी धारदार असली पाहिजे. त्यासाठी महात्मा फुलेच्या कार्याची सविस्तर चर्चा केली. मुक्ता साळवे ह्या सावित्रीबाई फुले यांची बहुजन समाजातील पहिली विद्यार्थिनी होत्या. वयाच्या 11 वर्षी शाळेत प्रवेश करून 14 व्या वर्षी स्त्री दास्य व शिक्षणावर भाष्य करणारे निबंध लिहून तथाकथित सामाजिक व शैक्षणिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या शिक्षिका म्हणून कार्य केले. आज त्यांच्या विचारांचा व कार्याचा जागर करून हे विचार व कार्य नव्या पिढीसमोर आणले पाहिजे.
या कार्यक्रमाचे आभार डॉ.तुषार घाटगे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.प्रभाकर माने यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रा.प्रकाश मेटकर, डॉ.सुनिल बनसोडे, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, मिरासाहेब कांबळे, मदन कांबळे,प्रा.श्रीकांत कांबळे हे मान्यवर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा