Breaking

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

*लखीमपुर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अकिवाट येथे केंद्र शासनाचा निषेध*

 

अकिवाट येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला


प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी


  अकिवाट : येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात घडवून आणलेल्या अमानुष हत्याकांडाच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कृषी कायदे,कामगारांना उध्वस्त करणारे कामगार कायदे,पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस इंधन दरवाढीसह वाढती खाजगीकरण या कारणास्तव केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या समर्थनार्थ अकिवाट येथे शिवसेना महाविकास आघाडी तर्फे गावामधून फेरी काढत केंद्र सरकारच्या विरोधात निषेध दर्शविण्यात आला.

       यावेळी मा.जिल्हा परीषद सदस्य इकबाल बैरागदार,शिवसेना मा.विभागप्रमुख बाळसिंग रजपूत ,युवासेना शिरोळ तालुका समन्वयक निलेश तवंदकर ,विभागप्रमुख उत्तमसिंग रजपूत,शाखाप्रमुख रामचंद्र हेरवाडे,अमिर तहसिलदार,बाळासो उमाजे,सचिन मिठारे,निंग्गाप्पा कट्टेकरी,पृथ्वीसिंग रजपूत,दारासिंग रजपूत,बाबुराव खुरपे,श्रेयश धूमाळे,विश्वनाथ रजपूत,अन्वर हाफीज,शाहीद तहसिलदार,उमर बहरुपी व महाविकास आघाडी शिवसेना युवासेना चे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा