Photo source-NDTV |
पुणे: एनसीबीने केलेल्या छापेमारीनंतर एनसीबीचा अधिकारी नसतानाही किरण गोसावी याने बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. गोसावी हा स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवत असताना तो एनसीबीच्या अटकेच्या कारवाईत हाय प्रोफाइल आरोपीला अटक कशी करतो? असा सवाल अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आणि गोसावीची सर्वत्र चर्चा सुरू झाली. आता याच गोसावीचा पुणे पोलिसही शोध घेत आहेत.
गोसावीवर पुण्यात व पालघर मधे आहेत फसवणुकीचे गुन्हे
पुण्यातील एका तरुणाने किरण गोसावी याच्या विरोधात सन २०१८ मध्ये पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गोसावी याने या तरुणाला मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३ लाख रुपये उकळले आहेत. यानंतर लगेचच पालघरमधूनही अशाच प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा समोर आला आहे, ज्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा घातला आहे. याशिवाय राज्यातभरात एकूण चार एफआयआर दाखल आहेत.
याचा अर्थ सन २०१८ पासून पुणे पोलिस किरण गोसावीचा शोध घेत आहेत. मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती सापडला नव्हता. ड्रग पार्टीवरील छापेमारीनंतर तो अचानक दिसला. एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला आणि आपल्या गाडीवर राजरोसपणे पोलिसांची पाटी लावून फिरणारा गोसावी आतापर्यंत पुणे पोलिसांना गुंगारा देऊन राजरोस फिरत होता का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबरोबरच एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला गोसावी पुणे पोलिसांना कसा सापडला नाही, असाही सवाल विचारला जात आहे.
गोसावी हा केपीजी ड्रिम्स रिक्रुटमेंट कंपनीचा मालक असल्याचीही चर्चा आहे. गोसावी हा खासगी गुप्तहेर असल्याचेही बोलले जात आहे.
शिवाय त्याचे पिस्तूल घेऊन फोटोही प्रसिद्ध असल्याचे नवाब मलिक यांनी आरोप करताना सांगितले आहे.(photo source-NDTV) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा