Breaking

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छ भारत व हरित शपथग्रहण कार्यक्रम संपन्न


हरित शपथग्रहण कार्यक्रम


गणेश कुरले : जयसिंगपूर प्रतिनिधी


जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवार  दि.११ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉलेजमध्ये स्वच्छ भारत व माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला.

       प्रारंभिक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना 'माझी वसुंधरा अभियानांतर्गत' उपस्थिताकडून हरित शपथ घेण्यात आली. यावेळी स्वयंसेवक विद्यार्थ्याकडून मनोभावे शपथ घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले.

       विद्यार्थ्यांनी सुरुवातीस क्लिन इंडियाचा नारा देऊन स्वच्छता अभियानामध्ये मनापासून सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्लीन इंडिया या अभियानांतर्गत तसेच म.गांधी पंधरवडा निमित्त कॉलेजमधील वेगवेगळ्या भागातील परिसर स्वच्छ करून सुशोभित करण्यात आला.

     सदर प्रसंगी उपप्राचार्य सुनील बनसोडे,प्रा.सौ.एस.जी.संसुद्धी, डॉ.महादेव सुर्यवंशी,प्रा.संतोष डफळापूरकर, डॉ. व्ही.बी.देवकर , डॉ.खंडेराव खळदकर प्रा.सौ.ए.एस.चावरे व प्रा.सौ.कल्पना पाटील हे प्राध्यापक प्रत्यक्ष सहभागी होऊन माझी वसुंधरा या अभियानांतर्गत हरित शपथ ग्रहण केली त्याचबरोबर क्लीन इंडिया मध्ये सहभागी होऊन कॉलेजचा परिसर स्वच्छ केला. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी निवडक संख्येने उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमास प्र.प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी मार्गदर्शन केले.या दोन्ही कार्यक्रमाबाबत सर्व घटकाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा