संग्रहित |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या स्टेट एलिजिबिलीटी टेस्ट (State Eligibility Test) अर्थात SET परीक्षेची उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे. ही उत्तरतालिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. उत्तरतालिकेतील उत्तरांवर हरकत/तक्रार घेण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे.
पुणे विद्यापीठामार्फत २६ सप्टेंबरला ३७ वी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. आज या परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली आहे. याबाबत काही तक्रारी तसेच सूचना असल्यास विद्यार्थ्यांना त्या नोंदवायच्या आहेत. पुणे विद्यापीठ संकेतस्थळावरील http://setexam.unipune.ac.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून या सूचना, तक्रारी दाखल करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या सेट विभागाकडून करण्यात आले आहे. उत्तरतालिकेबाबतची लिंक वेबसाइटवर १८ ते २८ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असून, याच कालावधीमधे सूचना व तक्रारी नोंदविता येणार आहेत.
Photo source - alamy.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा