नामदार यड्रावकरांची स्वागतध्यक्षपदी निवड |
प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी
दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक शतकमहोत्सवी अधिवेशन जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवड करण्यात आली.
बोरगांव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगांवकर यांनी केली.
यावेळी सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोरले हुबळी, जयपाल चिंचवाडे, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पापा पाटील, डॉ. आण्णासाहेब चोपडे, महिला महामंत्री भारती चौधरी, विमलताई पाटील, दादासो पाटील चिंचवाडकर, राजेंद्र झेले, बाळासाहेब पाटील, जी.जी. लोकोगोळ, अशोक जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा