कोल्हापूर सांगली बायपास रोड |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या हद्दीत अपघाताचा गुन्हा घडला असून याबाबतची फिर्याद सौ. सुहासिनी सौरभ फाटक वय 38 वर्षे, रा. चिंचवड पुणे 33 दाखल केली आहे.
संशयित आरोपी नितीन प्रकाश माने वय 34 वर्षे, रा. मानेगांव, ता. मिरज, जि. सांगली यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
03/10/2021 रोजी दुपारी 12. 15 वा. चे सुमारास कोल्हापुर सांगली जाणारे बायपास रोड, दानोळी फाटा येथे उत्तरेस असले रावसाहेब भाऊसाहेब पाटील यांच्या शेतासमोर डांबरी रोडवर जैनापुर गावचे हद्दीत ता. शिरोळ अपघातातील वाहने मारुती न्यु बैंगनर LXI CNG गाडी नं. MH 14 HQ 4573 व आयशर गाडी नं. MH 10Z0629 ही वाहने आहेत.
झालेल्या अपघातात सौ. सुनंदा सुभाष पोतदार व व.69 रा.भोसरी या जखमी झाले आहेत. तसेच अपघातील मारुती न्यु बॅगनर LXI CNG गाडी नं. MH 14 HQ 4573 व आयशर ता. पुणे, जि. पुणे व गाड़ी नं. MH 1020629 या दोन्ही वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अधिकृतपणे मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी ह्या त्याचे वॅग्नर गाडी नं. MH 14 HQ 4573 तून त्याचे घरातील कोल्हापुर येथुन सांगलीकडे जात असताना वरील तारखेस ,वेळी व ठिकाणी आले असता फिर्यादीचे समोरुन सांगलीकडुन कोल्हापुर कडे येणारा चारचाकी आयशर गाडी नं. MH 10Z0629 हा भरधाव वेगाने येवुन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलेने त्या गाडीचे मागील टायर हे बाहेर येवून फिर्यादीचे कारच्या ड्रायव्हींग साईडच्या उजव्या बाजुस येवुन जोराची धडक दिलेने फिर्यादी यांनी त्याचे ताबेतील वॅगनर गाडी नं. MH 14 HQ 4573 ही जागीच फिरल्याने ब्रेक मारुन गाडी जागीच थांबवली. तसेच सदर झाले अपघातामध्ये वॅग्नर गाडीचे ड्रायव्हिंग साईडचे उजव्या बाजुचा पत्रा चेपुन, टायर फुटुन, पुढील काच तडकुन व आयशर गाडीचे मागील दोन्ही टायर ऍक्सेलसह निघुन उजव्या बाजुस निघुन पडुन आयशर गाड़ी पलटी होवुन त्यातील ऑक्सीजनच्या रिकाम्या सिलेंडर टाक्या रस्त्यावर पडुन आयशर गाडीचे नुकसान झालेले आहे. फिर्यादीची आई सौ. सुनंदा सुभाष पोतदार द.व.69 रा. सुहास सदन आदीनाथ नगर भोसरी, ता पुणे, जि. पुणे यांना कपाळास मार लागुन दुखापत झाली आहे.
याबाबत फिर्यादी यांनी बाजुसप्रमाणे फिर्याद दिलेने वरील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून रिपोर्ट कोर्टात पाठविण्याची तजविज ठेवलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा.पो. नि. सो यांचे आदेशाने पो.ना. 450 चव्हाण हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा