Breaking

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

कोल्हापूर ; इचलकरंजी - हनी ट्रॅपला कंटाळून तरुणाची आत्महत्या जिल्ह्यातला, पहिला बळी

मृत संतोष निकम


      इचलकरंजी : हनी ट्रॅपच्या चर्चेला उधाण असतानाच जिल्ह्यात इचलकरंजी येथे हनी ट्रॅपने पहिला बळी घेतला. चंदूर येथील एका यंत्रमाग कामगाराने हनी ट्रॅपला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. संतोष निकम (वय 32 रा. शाहूनगर ) असे त्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ही आत्महत्या हनी ट्रॅपमुळे झाल्याचे सांगितले. या घटनेने हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. 


     सोशल मीडियावरून काही वर्षांपूर्वी एक युवतीने संतोषशी जवळीक साधली होती. दोघांचं चॅटींग सुरू झाले आणि दोघांचे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अश्लिल हावभाव सुरू झाले. युवतीने त्या गोष्टींचे रेकॉर्डींग करून संतोषला ब्लॅकमेल करत पैशाची मागणी केली. यावरून आपण फसवलो गेलो आहोत याची संतोषला जाणीव झाली. व बदनामीला घाबरून संतोषने शनिवारी ( 2 ) सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या आत्महत्येनंतर हनी ट्रॅपच्या चर्चेला उधाण आले आहे.

     सविस्तर वाचा... 👇🏼

       काय आहे हनी ट्रॅप ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा