Breaking

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

जयसिंगपूर पोलीस ठाणे हददीत 'ऑल आऊट ऑपरेशन' : एका इसमाकडून 66 हजार रुपये किमतीचे ०७ मोबाईल हॅन्डसेट जप्त

 

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हँडसेट चोरी

प्रविणकुमार माने : उपसंपादक


        जयसिंगपूर पोलीस ठाणेस गु.र.नं.३६६/२०२१ भादविस कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी सुनिल जुगाप्पा बेलवडेकर वय ४८ रा. तेरापंथी भवन समोर गल्ली नं ०८ जयसिंगपूर ता. शिरोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २६/०३/२०२१ रोजी सकाळी ०६.१५ वा. चे सुमारास त्यांचे राहते घरातुन हॉलमधुन कोणीतरी अज्ञात इसमांने रेडमी तसेच सॅमसंग कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले बाबत फिर्याद दिली होती

तपासत सापडलेले  हँडसेट

       कोल्हापूर जिल्हयात सध्या मालमत्तेच्या गुन्हयामध्ये वाढ झालेली असल्याने मा. अपर पोलीस महासंचालक सो, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ऑल आऊट ऑपरेशन करण्याचे आदेशीत केले होते. त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ तसेच जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील कर्मचारी असे जयसिंगपूर पोलीस ठाणे हददीत 'ऑल आऊट ऑपरेशन' करीत असताना गु.र.नं ३६६ / २०२१ भादविस कलम ३८० या गुन्हयाच्या अनुषंगाने विधीसंघर्ष बालक यांस विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील ०२ मोबाईल हॅन्डसेट तसेच इतर वेगवेगळ्या कंपनीचे ०५ मोबाईल हॅन्डसेट असे एकुण ६६,०००/- रुपये किंमतीचे ०७ मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेले आहेत.

    सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे सो पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर, मा.जयश्री गायकवाड अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा.रामेश्वर वैजने सो उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोसई प्रमोद वाघ, मपोसई स्वाती टकले, पोना ५६७ सागर सुर्यवंशी, पोकॉ ८८५ संदेश शेटे, पोकॉ २३८५ अमोल अवघडे, पोकों १३३३ रोहित डावाळे, पोकॉ २४२८ शशिकांत भोसले, पोकॉ २५४५ वैभव सुर्यवंशी तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोना १३१२ अमर वासुदेव यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा