तेरवाड मध्ये सोलर पॅनलची व्यवस्था करण्यात आली |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाड व ग्रामपंचायत सदस्य श्रीमती शोभा गोविंद आवळे यांच्या मदतीने तसेच मातंग समाज संघटना गंगापूर यांच्या सहकार्याने आज गंगापूर व लालनगर भागात सोलर पॅनल टॉवरचे बसवण्यात आले.
मा चंद्रकांत जोंग व माजी सरपंच सौ काजल कांबळे व आमचे मार्गदर्शक मा सदाशिव माळी आण्णा ,रामभाऊ चव्हाण दादा,प्रभाकर बंडगर, वंचित बहुजन जिल्हाध्यक्ष मा श्री विलास कांबळे सर, शाबगोंडा पाटील, आमगौडा पाटील व म्हादगोंडा पाटील यांच्या शुभहस्ते सोलर पॅनलचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आण्णा जोंग साहेब सुखदेव घटनटे, सौ लक्ष्मी घटनटे काकू, माजी सरपंच सौ ललिता ऐवाले, अनिल पाटील साहेब, अमोल खोत सर,विक्रम हेगडे, कुमार बनसोडे साहेब,मुरग्याप्पा हेगडे, सुखदेव हेगडे,कुमार पाटुकले, अरविंद नल्ला ,रोपन जोंग उपस्थित होते, उदघाटन प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश शेडबाले, शशिकांत सनदी, सुरेश शेडबाले, तुकाराम आवळे, रवी हेगडे, ऋषिकेश व्हसमाने,नामदेव आवळे यांनी केले, प्रस्तावना व आभार कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन चे अध्यक्ष उमेश आवळे यांनी केले, गावातील लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन कायमस्वरूपी प्रयत्नशिल असणार असे आवाहन उमेश आवळे यांनी व्यक्त केले, या सामाजिक कार्याचे व स्वखर्चातून काम करण्याच्या धडपडीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे ,या कार्यक्रमासाठी लाभलेले उदघाटक चंद्रकांत जोंग साहेब व प्रभाकर बंडगर साहेब यांनी भविष्यात कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशनला कसल्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही अवश्य मदत करु असे आश्वासन दिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा