Breaking

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

जैनापुरात अल-अमिन तरुण मंडळाच्यावतीने पैगंबर जयंती निमित्त मराठी शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

 

शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करताना

जैनापूर प्रतिनिधी :-  प्रा.महेबुब मुजावर


जैनापुर  : अल - अमिन तरूण मंडळ जैनापूर ता. शिरोळ जि.कोल्हापूर यांच्या वतीने महंमद पैगंबर जयंती निमित्त मराठी शाळा कुमार विद्या मंदिर,  जैनापूर या शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

      बुधवार दि. २० ऑक्टोबर रोजी जैनापूरात कुमार विद्या मंदिर शाळे मध्ये पैगंबर जयंती निमित्त शाळेतील सर्व पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वही ,पेन, पेन्सिल  व खोडरबर इत्यादी शैक्षणिक साहित्य देण्यात आले . पैगंबर जयंती निमित्त मुलांचा सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या देऊन याचा शिक्षणासाठी मुलांना मदत होईल , विशेष प्रेरणादायी बाब म्हणजे मंडळातील सर्व सभासदांनी मिळून आपल्या गावातील शाळेसाठी व विद्यार्थ्यासाठी काही तरी मदत करून सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं आदर्श कार्य या मंडळाच्या वतीने करण्यात आले.

     या प्रसंगी ईद - ए - मिलाद निमित्त  समाजातील घटकांचे तोंड गोड करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नुतन ग्रामपंचायत सदस्य, मा.झाकीर मुजावर ,सोसायटीचे सदस्य मा.करीम मुजावर, तसेच अल -अमिन तरुण मंडळाचे अध्यक्ष मा.मलीक मुजावर व उपाध्यक्ष,मा.अंजुम मुजावर , खजिनदार महेबुब मुजावर व सेक्रेटरी श्री.मोसिन  मुजावर व सदस्य श्री. गौस मुजावर,परवेज मुजावर,नासिर मुजावर व  fhh सर्व सदस्य व  शाळेचे मुख्याध्यापिका सौ.उषा सुतार मॅडम व  कांबळे सर उपस्थित होते .

    या प्रसंगी कार्यक्रमाचे आभार  शाळेचे मुख्याध्यापिका सौ.उषा सुतार यांनी मानले. 

   या मंडळाच्या वतीने आयोजित केलेला हा रचनात्मक कार्यक्रम सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा