Breaking

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

नागपूर : देशातील पहिली राज्य अखत्यारीतील वन्यजीव डीएनए प्रयोगशाळा महाराष्ट्रात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

संग्रहित छायाचित्र 



 आज नागपूर येथे देशातील पहिली राज्य अखत्यारीतील वन्यजीव डीएनए लॅब ( India's first state owned wildlife DNA laboratory) चे प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory  - RFSL) येथे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याआधी केंद्र शासनाच्या अखत्यारीत डेहराडून व हैदराबाद येथे अशी लॅब उभारलेली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारी अशी लॅब उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे आता वन्यजीव गुन्हेगारी विषयी अधिक माहिती मिळून प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना आळा बसणार आहे.


 याचधर्तीवर  मुंबई व पुणे येथेही प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा येथे ((Regional Forensic Science Laboratory - RFSL ) फास्टट्रॅक डीएनए युनिट चे उद्घाटनही करण्यात आले आहे. बालक अत्याचार संबंधी असणारा पॉस्को कायदा, 2012 नुसार (posco) या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. निर्भया योजना अंतर्गत ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. नांदेड व कोल्हापूरसह राज्यात आता अशा पाच प्रयोगशाळा झाल्या आहेत.

    कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, या प्रयोगशाळांमुळे पोलिस यंत्रणेस अधिक मजबुती येणार आहे. पोलिस यंत्रणांनी आता गुन्हेगरांच्या एक पाऊल पुढे असलं पाहिजे. जेणेकरून कोणताही गुन्हा होणारच नाही. मुख्यमंत्री हे ऑनलाइन आभासी पद्धतीने उपलब्ध होते.

      कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, गृह विभागाच्या न्यायिक व तांत्रिक शाखेचे महासंचालक संदीप बिश्नोई, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेच्या संचालक संगीता घुमटकर, उपसंचालक डॉ. विजय ठाकरे नागपूर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री मीण शंभूराज देसाई हेही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा