Breaking

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

इंदिरा गांधींच्या नावाने असलेली इमारत आता नरेंद्र मोदी यांच्या नावाने होणार. भाजपच्या मनात राष्ट्रीय नेत्यांबद्दल विष - काँग्रेस

 गुजरात येथील इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेली 'इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन ' ही इमारत काढून त्याजागी नवीन इमारत बांधण्याचे  व त्याला 'पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन ' असे नाव देण्याचा  प्रस्ताव मंजूर झाला असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. व त्यानंतर याचे कामकाज चालू होणार आहे.

संग्रहित छायाचित्र


    १९८३ साली काँग्रेस सरकारच्या काळात या इमारतीची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती म्हणून या इमारतीला त्यांचे नाव देण्यात आले होते.

    दरम्यान काँग्रेस ने याला कडाडून विरोध केला आहे. भाजप सुडाचे राजकारण करत आहे. " भाजपने नवीन काही निर्माण केले नाही, जे आहे ते विकायला काढले व जे विकू शकत नाही त्याची नावे बदलत सुटले आहे. आधी सरदार पटेल यांच्या नावे असलेले स्टेडियम चे नाव बदलून नरेंद्र मोदी असे केले व आता हे . आता पुढे इंदिरा गांधी पंचायती राज संस्थेचे नावही नरेंद्र मोदी यांच्या नावे ठेवले जाईल. राष्ट्रीय नेत्यांबद्दल भाजपाच्या मनात विष भरले असल्याचा आरोप त्यांनी केला.





Photo and news source - loksatta

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा