Breaking

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

यशोदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरोळच्या वतीने आंदोलन अंकुशचे प्रमुख मा.धनाजी चुडमुंगे यांचा सन्मान व संस्थेस केली आर्थिक मदत*

 

आंदोलन अंकुश धनाजी चुडमुंगे


प्रा.चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी


 शिरोळ : ध्येयनिष्ठ समाजसेवेचे व्रत घेऊन अविरत कार्यरत असणारे शिरोळ गावचे थोर सुपुत्र मा. धनाजी चुडमुंगे यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळले पण जन्मापासूनच अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, अन्यायग्रस्त लोकांसाठी काहीतरी करण्याची उमेद यातूनच 2006 साली गॅस एजन्सीच्या विरोधात आंदोलन करून तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना न्याय मिळवून दिला.यातूनच पुढे *आंदोलन अंकुश* या सामाजिक संस्थेचा जन्म झाला. तेव्हापासून आजतागायत श्री *धनाजी चुडमुंगे*  याच्या नेत्तुत्वाखाली अगणित आंदोलने झाली. बघता बघता संघटनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला.

     या संघटनेच्या माध्यमातून अन्नपुरवठा विभाग , संजय गांधी निराधार योजना, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी अनेक प्रशासकीय कार्यालयावर वचक बसला.कायद्याच्या माध्यमातून गरीब ,कष्टकरी,शेतकरी,दिनदुबळे,यांना न्याय मिळवून देण्याचे सामाजिक कार्य आपल्या माध्यमातून संघटनेच्या सर्व सहकार्यानी केले.सन 2016 नंतर उसाच्या दराचा प्रश्न हाती घेतला व त्यातील एक एक मुद्दे कायद्याच्या माध्यमातून मांडून, त्याचा अभ्यास करून प्रत्येक वर्षी ऊस दरावर तोडगा काढुन न्याय मिळवून दिला.

     सन २००५,२००६,२०१९ व २०२१ साली आलेले महाप्रलयकारी महापूर याचा सखोल अभ्यास करुन त्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असणारे कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण या विरोधात देखील  आंदोलनाचे अस्त्र उचललेले. कोरोनाच्या काळात संघटनेच्या मार्फत कोरोना उपचार कक्ष उभारुन अनेक रुग्णांना बिलापोटी लाखो रुपये परत मिळवून दिले . या माध्यमातून रुग्णांना अनेक समस्येतून बाहेर काढून विविध प्रकारे मदत केली हे कार्य उल्लेखनीय आहे . म्हणूनच संघटनेने केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन 

 यशोदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरोळ यांच्या वतीने गौरवपत्र, बैलजोडी व आर्थिक मदत आदरपूर्वक प्रदान करून आंदोलन अंकुश या संघटनेच्या वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी यशोदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अमोल गावडे, राजू काळे, चिदानंद अळोळी,संदीप पाटील व आंदोलन अंकुश चे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा