Breaking

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

*अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपूर संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ; 11 टक्के डिव्हिडंडची घोषणा*


वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होताना

*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


 जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील नावाजलेली व ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपूर संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

       सदर सभेत संस्थेचे अध्यक्ष प्रा.के.बी.पाटील, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. पाटील व पतसंस्थेचे कार्यशील व्यवस्थापक राहुल पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक विकासाच्या उत्कर्षा बाबत व यशस्वी वाटचालीची सविस्तर माहिती दिली. संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे वाचन उत्तम पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन समाधानकारकरित्या करण्यात आले.

      त्याचप्रमाणे संस्थेस चालू आर्थिक वर्षात  ₹१३,३८०००/ चा निव्वळ नफा प्राप्त झाला असून संस्थेने सभासदांना ११% लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

     कोरोना महामारीच्या नियमांच्या अधीन राहून संस्थेने निवडक सभासद व संचालकांच्या उपस्थितीत ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने सभा अत्यंत उत्साहात पार पडली.

      वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रा.आर.एम.मिश्रीकोटकर,प्रा.डॉ ए.ए. पुजारी, महावीर पाटील, संजय चावरे, संजीव मगदूम, प्रदिप सुतार, सुहास हिरुकडेप्रा,.एम.एस.पाटील,प्रा. व्ही. व्ही.चौगुले  व एस.बी. कणसे हे संचालक उपस्थित होते. त्याचबरोबर पत संस्थेचे कर्मचारी वंदना मगदूम या देखील उपस्थित होत्या.

       संस्थेने जाहीर केलेल्या लाभांश व संस्थेच्या उत्तम सेवाभावी वृत्तीमुळे सभासदांच्या कडून आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

२ टिप्पण्या: