संग्रहित छायाचित्र |
आज t 20 वर्ल्ड कप मधे भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. आणि भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणलं की संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधलेले असते. मग त्यात आर्थिक व्यवहार असो की सामाजिक सुरक्षेचा.
त्यात कोल्हापूर म्हणलं की सगळे विषय हार्डच.क्रिकेट असो वा इतर कोणतीही मॅच भारताने ती मॅच जिंकली की कोल्हापुरकर जल्लोष करण्यात कायम पुढे दिसतात.
२०१९ साली झालेल्या भारताच्या विजयावेळी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक व इचलकरंजी मधील मलाबादे चौक तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
सध्याचा कोरोना काळ लक्षात घेता पुन्हा अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको यामुळे या परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच उघड्यावर व चौकात पडदा ( स्क्रिन ) न लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा